मुंबई : कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो', 'दिल्लीचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो', 'आले रे आले... हात हलवत आले... दिल्लीवरून आले.. हात हालवत आले... अशा जोरदार घोषणा दिल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केली. यावेळी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर घोषणाबाजी केली. विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन सुरुच होते. कर्जमाफी झालीच पाहिजे, असे म्हणत विजय मल्ल्या के दलालो को.. जुते मारो सालो को...नागपुरचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो..दिल्लीचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो..अशी घोषणा करुन परिसर दणाणून सोडला.


आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी शिवसेनेनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री तातडीची कॅबिनेटची बैठक बोलावली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरळीत होईल की नाही याची सरकारला चिंता आहे. 


कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय काम चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिलाय. विरोधकांची मनधरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र शिवसेनेला गोंजरण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेले. तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनटेची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेना अर्थसंकल्पाला पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपनं केलाय. 


मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शिवसेना कोणताही अडथळा आणणार नाही असा दावा भाजपाकडून करण्यात येत असला तरी शिवसेनेच्या नेत्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं नाही.