विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचं, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलं आहे.
मुंबई : वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचं, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलं आहे.
विलास शिंदे यांच्यावर साताऱ्यातील शिरगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विलास शिंदे हे मुंबईत वांद्रे येथे वाहतूक पोलिसाचे कर्तव्य बजावत असताना, त्यांनी एका बाईक चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला हेल्मेट विचारले, यानंतर त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचं दिसून आलं.
मात्र या मुलाने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले यानंतर या मुलाच्या एका नातेवाईकाने बांबूने विलास शिंदे यांच्या डोक्यावर मागून वार केला. यानंतर ते खाली पडले, त्यांच्यावर लीलावती रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं.