मुंबई : मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सविता गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहे. दोघांना तात्काळ येथील सावित्रीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची तब्बेत चांगली आहे.


साविता गुप्ता आज नेहमीप्रमाणे लेडिज स्पेशल ट्रेनसाठी स्टेशनवर आल्या. पण लेडिज स्पेशल गाडीत पुरुष चढल्यानं त्यांना ही गाडी सोडावी लागली. त्यानंतर आलेल्या कल्याण सीएसटीमध्ये तुफान गर्दी होती. दिवा स्टेशन सोडल्यावरच त्यांना प्रसुतीवेदना होऊ लागल्या. भांडूपला कळा अनावर झाल्यावर सविता गुप्तांना इतर प्रवासी महिलांनी खाली उतरवलं आणि तिथेच त्यांची प्रसूती झाली.