मुंबई :  मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय. गेल्या दहा दिवसांत डेंग्यूचे 136 रुग्ण आढळून आले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 296 रुग्ण आढळून आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 3 हजार 287वर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 


सप्टेंबर 2015 मध्ये केवळ 248 रुग्ण होते. ८० टक्के रूग्ण १५ ते ४५ वयोगटातील आहेत. मुंबईत आतापर्यंत डेंग्यूमुळं तीन जणांचा मृत्यू झालाय.