किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर खिल्ली उडविणारे पोस्टर...
भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली.
मुंबई : भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली.
पोस्टर लावणारे हे कोण होते हे जरी स्पष्ट झाले नसले तरी यामध्ये शिवसेनेवर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेने भाजप मध्ये सुरु असलेले पोस्टर वॉर संपण्याचे नाव घेत नाहीये हे यावरून स्पष्ट होत आहे.
ही दोन पोस्टर अवघ्या 15 मिनिटमध्ये काढण्यात आली. मात्र यानिमित्ताने सेना भाजपा शाब्दिक हल्ले सुरुच रहाणार असे दिसत आहे.