मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर हेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेरकर हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे.


आज मातोश्रीवर जाऊन ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.