मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मेट्रो 3च्या कामाची पाहणी केली. सिप्झ ते कुलाबा दरम्यान मेट्रो 3चं काम सुरु आहे. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो 3 अंतर्गत कुलाबा-बांद्रा-सिप्झ असा साडे तेहत्तीस किलोमीटरचा भूमिगत मेट्रो मार्ग बांधण्याचं काम सुरू आहे. यामार्गावर 27 स्थानकं असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानकं भूमिगत असतील. 


मुख्यमंत्र्यांनी या कामाच्या पाहणीचा दौरा आझाद मैदानातून रात्री पावणे बारा वाजता सुरू केला. त्यानंतर संपूर्ण साडे तेहत्तीस किलोमीटरचा प्रवास केला.