मुंबई :  VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र  केवळ दिवे काढून VIP संस्कृती संपणार नाही तर त्या सोबत शासकीय खर्चाने होणारे मंत्र्यांचे होणारे परदेश दौरे , स्वागत सोहळे आणि स्वतःचे फोटो टाकून होणारी जाहिरात बाजीही थांबवली पाहिजे, असाही सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 


विरोधी पक्षनेता या पदाला कॅबीनेट दर्जा असल्याने मी ही उद्यापासून लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.