एमबीबीएस मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश कठीण
राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळं एमबीबीएस झालेल्या मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश मिळणं कठीण झालंय.
मुंबई : राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळं एमबीबीएस झालेल्या मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश मिळणं कठीण झालंय. यंदा पोस्ट ग्रँज्यूएशनचे सर्व प्रवेश हे नीट अंतर्गत होत असल्यामुळं, इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातील मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळं भूमीपुत्रांवर अन्याय होतोय.
इतर राज्यात तिथल्या भूमिपुत्रांना प्राधान्य मिळत असल्याने जादा मार्क्स मिळूनही मराठी मुलांना तिथं प्रवेश मिळेनात. तर याउलट महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठांमधील १०० टक्के प्रवेश हे देशभरातील मुलांसाठी खुले आहेत. राज्य सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास राज्यातील मराठी डॉक्टर प्रवेशापासून वंचित राहतील.