दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला अपघात झाल्याची अफवा व्हायरल
ही बातमी आहे अफवेची.....व्हॉट्अपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळत असली तरी अफवांचं पीकही मोठ्य़ाप्रमाणवर पसरत असतं...त्याचंच हे एक उदाहरण आहे.
मुंबई : ही बातमी आहे अफवेची.....व्हॉट्अपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळत असली तरी अफवांचं पीकही मोठ्य़ाप्रमाणवर पसरत असतं...त्याचंच हे एक उदाहरण आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला नागोठाण्याजवळ अपघात झाल्याची वृत्त फोटोंसह व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. नागोठणे-निडी स्टेशनदरम्यान भिसेखिंडजवळ बोगद्यात हा अपघात झाला.
इंजिनसह चार बोगी रूळावरून घसरल्याने अपघात झाला. त्यामुळे रेल्वेचे काही डबे बोगद्यात तर काही बाहेर आहेत. घटनास्थळी अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही. पण कुर्ला आणि कल्याणहून मेडिकल रिलिफ ट्रेन रवाना झाल्या आहेत. मात्र हे वृत्त खोटं असून हे फोटोही चुकीचे असल्याचं स्पष्ट झालंय.
विशेष म्हणजे या बातमीसह दिलेला सावंतवाडीचा मदत क्रमांक 02352-228176 जुना असून तोदेखील चुकीचा असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल के वर्मा यांनी दिलीय. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलंय.