मुंबई : राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला नाही, असे त्यांनी फटकारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावर रूजू होण्याची आवाहन केले. राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा असे ते म्हणाले. 


तसेच डॉक्टरी पेशा हा अत्यंत नोबल व्यवसाय असून हा पेशा स्वीकारताना घेतलेली शपथ त्यांनी विसरू नये, याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही. उपचाराविना कोणी गरिबाचा जीव जाऊ नये, याचे भान ठेवा. डॉक्टरांना तात्काळ आपल्या सेवेत यावे. सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.