बायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली
डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं.
मुंबई : डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं.
शाजियाबाबत विचारलेल्या प्रश्नावर 'माझ्याबद्दल प्रश्न विचारा, माझ्या बायकोबद्दल नाही', असे उत्तर हेडलीने दिले. शाजिया अजूनही माझी कायदेशीर पत्नी आहे आणि ती मूळची पाकिस्तानी आहे व तिने कधीही भारताला भेट दिली नाही, असे हेडलीने यावेळी स्पष्ट केले.
लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला बुधवारी सुरुवात झाली. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अबू जुंदाल याचा वकील अब्दुल वहाब खान याने हेडलीची उलटतपासणी घेतली.