मुंबई : मुंबईतील दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरीनिर्वाण दिनावर यंदा ड्रोनच्या मार्फत सुरक्षा ठेवली जाणारेये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर येथील शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. या दिवशी देशभरातून लोकं येणार असल्याने मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त आर डी शिंदे मध्य मुंबई यांच्यावर चैत्यभूमी येथील सुरक्षेची जबाबदारी दिलीये. त्यानुसार ५ एन्ट्री पॉइंट आणि ५ एक्झिट पॉइंट तयार करण्यात आले असून, याठिकाणी राज्य राखीव दल, शिघ्रकृती दल, जवळपास १ हजार मुंबई पोलीस, सीसीटिव्ही कॅमेरे, बॅगेज स्कॅनर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोन मार्फत ठेवली जाणार नजर ठेवली जाणारेये.


तसेच गर्दीचा फायदा घेवून घातपात होवू नये याकरता सिव्हील ड्रेस मध्ये पोलीस मुंबई पोलीस तैनात केले जाणारेत, शिवाय या दिवशी ट्रॅफिकची ही मोठी यंत्रणा उभारण्यात आलीये, त्यानुसार ५ डिसेंबर पासून ते ६ डिसेंबर पर्यंत शिवाजी पार्क भागात पार्किंग करण्यास मनाई करण्यास आलीये.