मुंबई : एक दिवस सगळं मंत्रीमंडळ मराठवाड्यात या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच खोडा घातलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्याचा आजचा दौरा चंद्रकांत पाटील यांनी रद्द केलाय. ते सांगली जिल्ह्यात जतमध्ये जाणार आहेत. तर पंकजा मुंडेही बीडमधल्या गेवराई तालुक्यात केवळ एका गावाला भेट देऊन दिल्लीला जाणार आहेत. 


लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आमदारांची बैठक घेणार आहेत... ही बैठक उद्या असताना पंकजा आजच दिल्लीला काय जातायत, हा प्रश्नच आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दीपक सावंत यांनी परांडा आणि भूमचे आपले दौरे कालच आटोपलेत. 


उद्योगमंत्री देसाई यांची परदेशी शिष्टमंडळासोबत पूर्वनियोजित बैठक असल्यानं त्यांनी कालच दौरा करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलाय. त्यामुळे हे चार मंत्री आज संध्याकाळी होणाऱ्या आढावा बैठकीला उपस्थित नसतील.