मुंबई : धक्कादायक बातमी. दारू पिऊन एका मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी भिडे नावाची ही मुलगी तिच्या मित्रांबोरबर रात्री वरळी भागात रॅश ड्रायव्हिंग करत होती. तिची कार डिव्हायडर आणि फुटपाथवर चढली. त्यावेळी स्थानिक जमा झाले. त्यांना ती शिव्या द्यायला लागली. त्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे तिनं प्रचंड हंगामा केला. 


नशेत असलेल्या गौरीने पोलिसांनाही मारहाण केली. पोलीस स्टेशनमधली एक खिडकीही तिने तोडून टाकली. कॉम्प्युटरच्या वायरी तोडून टाकल्या. पोलिसांचे मोबाईल फेकून दिलेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी ही मुलगी आणि तिच्या मित्रांना अटक करुन नंतर जामिनावर सोडून दिले.