मुलुंड : साईप्रस्थ विभागात असलेल्या पालिकेच्या उद्यानांमध्ये दारुड्यांनी उच्छाद मांडलाय. दिवसभर या उद्यानांमध्ये प्रेमी युगुल आणि दारुड्यांचा राबता असतो. तसंच या ठिकाणी काही बाईकरायडर संध्याकाळच्या वेळेस स्टंट करतात. त्यामुळे या विभागात राहत असलेल्या रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात वेळोवेळी नागरिकांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. मात्र, हा त्रास काही कमी होत नसल्यानं नागरिक रस्त्यावर उतरलेत. 


नागरिकांनी स्वतःच या ठिकाणी गस्त घालून दारुडे आणि प्रेमी युगुलांची हकालपट्टी सुरु केली आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारतायत.