सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय लष्कर आणि पंतप्रधानांना- मनोहर पर्रिकर
सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडलंय. त्यामुळे टीका करणा-यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मुंबई : सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडलंय. त्यामुळे टीका करणा-यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
जम्मू-कश्मीरमधील उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. या ऑपरेशनमध्ये 40 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं होतं. यानंतर पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटना चांगल्याच संतापल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांकडून भारतविरोधी कारवाया सुरु झाल्या आहेत.