मुंबई : तुम्हाला अंड खायला आवडतं का? तुम्ही जर मुंबईत राहात असाल तर तुमचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. कारण, मुंबईकरांना आता अंडी स्वस्तात मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या एग ट्रेडर्स असोसिएशने अंडी उत्पादकांकडून अंड्यांची थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी त्यांना नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी म्हणजेच एनईसीसीच्या मार्फत खरेदी करावी लागत होती. यामुळे अंडी महागात मिळत असल्याचा दावा मुंबई एक ट्रेडर्स असोसिएशने केला होता.


आता मात्र कोणत्याही मध्यस्थाची या भूमिका राहणार नसल्याने थेट उत्पादकांकडून ग्राहकांना माल मिळणार आहे. यात सर्वांचाच फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढे संडे हो या मंडे, रोज खाओ 'भरपूर' अंडे!