मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या मागणीनंतर आता निवडणूक आयोगानं सामना दैनिकाला पत्र पाठवलं आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये तुमचा अभिप्राय काय आहे ते कळवा, असं आयोगानं पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामनामधील वृत्तांमुळं आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केलाय. 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपनं केली होती.