मुंबई : पुढील सहा महिन्यात विविध निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. याला कारण आहे मुंबई, ठाणे, पुणेसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राज्यात विविध प्रकल्प कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन उड्डाणपुलांचं भूमिपूजन पार पडलं. मात्र हे भूमिपूजन म्हणजे " ये एक झाँकी हे पिक्चर अभी बाकी है......"  असं म्हणायला भरपूर वाव आहे. कारण पुढल्या दोन एक महिन्यांत राज्यात काही अत्यंत महत्त्वांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे सोपस्कार धडाक्यात पार पाडले जाणार आहेत. त्यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 


अंमलबजावणीची बोंब!


- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक 
- मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस हाय वे 
- न्हावा शेवा -  शिवडी समुद्र सेतू 
- वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली मेट्रो 
- नवी मुंबई विमानतळ 
- मुंबई कोस्टल रोड 
- अंधेरी - वांद्रे - मानखुर्द मेट्रो 
- वरळी - शिवडी उड्डाणपूल 
- सीएसटी - पनवेल जलद रेल्वेमार्ग 
- चर्चगेट - विरार उन्नत रेल्वेमार्ग 
- कळवा - ऐरोली उन्नत रेल्वेमार्ग 
- मुंबई अहमदाबाद महामार्ग विस्तारीकरण 
- मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रुंदीकरण 
- ठाणे - बोरीवली भुयारी मार्ग
- बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प 
- धारावी पुनर्वसन प्रकल्प 
- मुंबई - नवी मुंबई नवा खाडी पूल


या सोबतच ग्रामविकास, आदिवासी, सामाजिक न्याय, पाणी पुरवठा विभाग यासह राज्य सरकारच्या इतरही विभागांच्या विविध योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. शिवाय जिल्हा आणि गाव पातळीवर विविध योजना-सुविधांचं भूमीपूजन केले जाणार आहे ते वेगळेच.