मुंबई : शिवसेनेने राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय पर्याय असून शकतो यातील एक पर्याय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेनेने पाठिंबा काढला तर या संदर्भात विधीमंडळाच्या गॅलरीत काही आमदारांची चर्चा सुरू होती.  त्यात एक पर्याय असा होता की शिवसेना सरकारच्या विरोधात गेली तर विरोधकांची संख्या मोठी होईल. त्यावेळी शिवसेनेला सत्तेसाठी तयार करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला तर हाही पर्याय तयार होऊ शकतो, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना केला. पण पुढे त्यांनी लगेच सावरत राज्यस्तरावर शिवसेनेसोबत जाण्याची शक्यताही पृथ्वीराज चव्हाणांनी फेटाळलीये... 


शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकार पडेल असं नाही... भाजपा अल्पमतातलं सरकार चालवेल, असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्त केलाय. मात्र आता शिवसेनेनं बाहेर पडावं, असंही चव्हाण यांचं म्हणणं आहे. 


भाजपकडे एकूण मित्रपक्ष आणि पाठिंबा असलेल्या आमदारांची संख्या १३९ च्या आसपास होईल, तर विरोधकांची म्हणजे शिवसेना विरोधकात आली तर त्यांची संख्या १५०च्या आसपास होईल. त्यामुळे राज्यात हे गणित होऊ शकते. पण ते शक्य नाही असेही चव्हाण म्हणाले.