मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने कंबर कसली आहे.'चोखा बाटी' हा उत्तर भारतीयांमध्ये एका खाद्य पदार्थाशी संबंधित असलेला कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित करण्याचे भाजपने ठरवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कार्यक्रम 2 ऑक्टोबरला होत असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी भाजपच्या उत्तर भारतीय नेत्यांमध्ये सुरु असून मुंबईतील उत्तर भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या कार्यक्रमा निमित्ताने भाजपमध्ये एक वेगळेच राजकारण रंगत आहे.


नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत विधान परिषदचे सदस्यत्व मिळवणारे आर एन सिंह यांना या कार्यक्रमानिमित्त शह दिला जात आहे. भाजपमधील एक उत्तर भारतीय गट ज्याचा आर एन सिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. आता हा गट आर एन सिंह यांचे महत्व वाढू नये यासाठी प्रयत्नशील आहे. 


या गटाने पुढाकार घेत आर एन सिंह यांचे महत्व वाढू नये यासाठी कार्यक्रमाची आखणी केली आहे. म्हणूनच 'चोखा बाटी' कार्यक्रमाद्वारे भाजपमध्ये एका दगड़ामध्ये दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न सुरु आहे.