मुंबई : घरात राहून कोणीही शेर असतो, एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्जिकल स्ट्राईक करायला फडणवीस गेले होते का मोदी, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


सर्जिकल स्ट्राईक करून बघा, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्याना लाज वाटत नाही. सैनिकांनी गोळ्या झेलल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.