मुंबई : सुरक्षेसाठी १०० क्रमांक देण्यात आलाय. मात्र, याचा गैरवापर काहीजण करीत असतात. तसेच पोलिसांना खोटे कॉल करुन त्रास दिला जातो. हे रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जर यापुढे निनावी कॉल करुन खोटे बोलल्यास तरुंगाची हवा खावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या ठिकाणी ‘बॉम्ब’ ठेवलाय असा निनावी कॉल करून पोलीस यंत्रणेस उगाचच कामाला लावणार्‍यांना आता चाप बसणार आहे. निनावी, खोटे फोन कॉल करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. तसे झाल्यास उगाचच खोटे कॉल करणाऱ्याला एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.


एखाद्या निनावी फोन कॉलमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते. तसेच कामाचा अचानक ताण येतो. अशा कॉल्सचा पोलीस आणि सामान्यांना त्रास होतो. याची दखल घेऊन मुंबई पोलीस प्रशासनाने कायद्यात संशोधन करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.