शिवसेना-भाजपची लढाई आता रस्त्यावर, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
महापालिका निवडणुकांवेळी शिवसेना-भाजपमध्ये झालेली शाब्दिक लढाई आता रस्त्यावरही सुरु झाली आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
मुंबई : महापालिका निवडणुकांवेळी शिवसेना-भाजपमध्ये झालेली शाब्दिक लढाई आता रस्त्यावरही सुरु झाली आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
पराभव झालेले उमेदवार आणि निवडून आलेले नगरसेवक आपल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी अनधिकृत होर्डींग लावत आहेत. असेच होर्डींग्ज लावत असताना भाजपचा कार्यकर्ता असलेल्या रिक्षावाला आणि शिवसैनिकांची बाचाबाची झाली. त्याचं पर्यवना तुंबळ हाणामारीत झालं.
यात दोन्ही बाजूचे 6 कार्यकर्ते जखमी झाले असून घाटकोपर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या 12 जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी 4 जण फरार आहेत. फरार आरोपींमध्ये नगरसेविका अश्विनी हांडे यांचे पती मावळते नगरसेवक दीपक हांडेही फरार आहेत. तर भाजपकडून निवडणूक लढलेल्या प्राची विचारे यांचे पती प्रवीण विचारे यांना अटक करण्यात आलीय.