मुंबई : फेसबुकवर तुम्हाला अनेक फ्रेन्डरिक्वेस्ट येतात, पण यात काही लोकांना फेक प्रोफाईल बनवण्याचा रोग आहे. यामुळे अनेक जण रिक्वेस्ट स्वीकारत नाहीत, पण यामुळे अनेक चांगल्या व्यक्तीही दुरावतात, अनेकांचे ओरिजन प्रोफाईल असले तरी ते स्वीकारले जात नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय जे फ्रेडलिस्टमध्ये नाहीत, त्यांच्याकडून तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये कोणतीही लिंक पाठवली जात असेल तर त्यावर क्लिक करू नका, यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होण्याचा धोकाच जास्त असतो.


१) प्रोफाईचे मित्र पाहा


तुम्हाला ज्या प्रोफाईलकडून रिक्वेस्ट आली आहे, त्यांचे मित्र पाहा. एखाद्या मुलीच्या नावाने प्रोफाईल असेल तर फोटो पाहा, फोटो वेगवेगळे किंवा नेटवरून टाकल्यासारखे असतात, मुलींचे फोटो नेटवरून वापरून फेक प्रोफाईल बनवलेले असतात. अशा प्रोफाईलचे फोटो फेसबुकला कळवा, फोटोच्या बाजूला हे ऑप्शन असते. काहींना चार-पाच मित्र असतात, त्यांचेही प्रोफाईल पिक्चर्स अनेक वेळा अश्लील असतात.


२) प्रोफाईचं नाव गुगलवर सर्च करा


प्रोफाईचं नाव गुगलवर सर्च करा, तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने किती पेजेस आहेत, तो काय करतो याची माहिती मिळेल, जर तसं नसेल, किंवा माहिती मिळत नसेल तर असं प्रोफाईल फेक असू शकतं.


३) टाईमलाईन पाहा


अनेक व्यक्तीच्या प्रोफाईलवर पोस्ट विचित्र असतात किंवा नुकत्याच असतात, ओरिजनल अकाऊंटच्या लिंक अनेक वर्षापासूनच्या असतात, त्यावरील सातत्य दिसून येतं.


४) दुसऱ्याच मुलीचे सुंदर फोटो लावून गंडवलं जातं


एखाद्या सुंदर तरूणीचे फोटो नेटवरून सर्च करून प्रोफाईल इमेजवर टाकले जातात, आणि हे फोटो पाहून अनेक जण फसतात, या मुली तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिंक पाठवतात, त्यावर क्लिक केल्यावर अकाऊंट हॅक होते.


५) टाईमलावनर विचित्र फोटो,  पोस्ट, प्रतिक्रिया


अशा प्रोफाईलवर सुंदर मुलीचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्याखाली विचित्र पोस्ट टाकल्याचं दिसून येतं, यावर कुणीही आक्षेप घेतलेला नसतो, फोटोत दिसणाऱ्या मुलीनेही नाही, तेव्हा समजा हे फेक आहे.