मुंबई : अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळून जळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्लीतील निगम मेस्त्री चाळीच्या तळमजल्यावर हे मेडिकल स्टोअर आहे. या मेडिकल स्टोअरला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणली.


या आगीत दुकानातील माल जळून खाक झाला. ही आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तळमजल्यावरील मेडिकल स्टोअरला लागलेल्या आगीची झळ पहिल्या मजल्याला बसली. पहिल्या मजल्यावरून खाली येण्याचा मार्ग मेडिकल स्टोअरच्या मागूनच जाणारा असल्याने नागरिकांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मोठा प्रसंग या कुटुंबीयांवर आला. मृत्यूमुखींमध्ये एका दोन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.