मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत युती संदर्भात प्राथमिक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत ठोस काहीही निष्पन्न झालेलं नाही. महापालिकेमध्ये पारदर्शी कारभार झाला पाहिजे हा मुद्दा भाजपनं लावून धरला. याबाबत आम्ही भूमिका घेऊ शकत नाही, वरिष्ठांबरोबर चर्चा करावी लागेल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेत्यांच्या भेटीत चर्चेतून काही मुद्दे समोर आले, ते आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहेत. सीएम आणि उद्धव यासाठी एकत्र भेटतील. ते काही मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती अनिल देसाईंनी दिली. तर 21 जानेवारीपर्यंत युतीसंदर्भात चर्चा पूर्ण करू अशी डेडलाईन निश्चित केली जाईल असं आशिष शेलार यांनी सांगितलंय.  


या बैठकीसाठी भाजपचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.  शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब आणि रवींद्र मेर्लेकर हजर होते. दरम्यान या बैठकीत कोणताही फॉर्म्यूला शेअर झाला नाही.