चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला
दुरुस्तीनंतर चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ठाण्यातील जुना वर्सोवा पूल काही कामानिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
मुंबई : दुरुस्तीनंतर चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ठाण्यातील जुना वर्सोवा पूल काही कामानिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
लोड टेस्टिंगसाठी 14 ते 17 मे या चार दिवसांसाठी जुना वर्सोवा पूल बंद ठेवण्यात आला होता. भिवंडी मार्गे ठाणे हा पर्यायी मार्ग उपलब्ध होता. मुंबई तसंच ठाण्याकडून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक जुन्या वर्सोवा पुलावरून जाते.
१५ सप्टेंबरपासून या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच पूल खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दररोज मोठ्या वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते.