मुंबई : मुंबईतल्या वाहनधारकांसाठी खूषखबर. दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या 'ए' विभागांतर्गत येणा-या ३९ वाहनतळांच्या बाबत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईस्तोवर या सर्व जागांवर 'मोफत पार्किंग' घोषित करण्यात आले आहे. 


याठिकाणी मोफत पार्किंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळील पी. जे. रामचंदानी मार्ग, विधानभवन मार्ग, जमशेदजी टाटा मार्ग, विद्यापीठ मार्ग, हॉर्निमन सर्कल, जहांगीर आर्ट गॅलरी, एन. सी. पी. ए., मरीन ड्राईव्ह यासारख्या सुपरिचित परिसरातील वाहनतळांचा समावेश आहे. 


या सर्व ३९ वाहनतळांच्या ठिकाणी साधारणपणे ७ हजार १४६ वाहने `पार्किंग' करता येणे शक्य आहे. यामध्ये ४ हजार ९२४ चारचाकी तर २ हजार २२२ दुचाकी वाहनांचा समावेश आहे.


अ.क्र. वाहनतळाचा संक्षिप्त पत्ता चार चाकी पार्किंग क्षमता  दुचाकी पार्किंग क्षमता
1 दोराबजी टाटा (एन. एस.) मार्ग 202 90
2 विधानभवन मार्ग 87 39
3 एनसीपीए मार्ग 71 32
4 जमशेदजी टाटा मार्ग (रिट्झ हॉटेल व पेट्रोलियमच्या दरम्यान) 70 31
5 विनय के. शाह मार्ग आणि गोयंका मार्ग 98 44
6 फ्री प्रेस मार्ग आणि व्ही. व्ही. राव मार्ग 140 63
7 जमनालाल बजाज मार्ग 117 52
8 हॉर्निमन सर्कल, व्ही. एन. रोड आणि होमजी स्ट्रीट 441 197
9 एस. ए. ब्रेलवी मार्ग 70 31
10 मुंबई समाचार मार्ग 123 55
11 पी. जे. रामचंदानी मार्ग (गेट वे ऑफ इंडिया जवळील मार्ग) 99 44
12 महाकवी भूषण मार्ग आणि जवळील छोटे रस्ते 295 132
13 पी. जे. रामचंदानी मार्ग जंक्शनपासून एम. बी. रोड जंक्शन पर्यंत आणि मंडलिक मार्ग 45 20
14 बोमनजी कावसजी बेहराम रोड, बॅरो रोड, हेंद्री रोड, वॉल्टन रोड, ऑलिव्हर स्ट्रीट आणि गार्डन पथ 270 120
15 सुंदरलाल बहल मार्ग ते लॉयन गेट पर्यंतचा शहिद भगतसिंग मार्ग 66 29
16 जी. एन. वैद्य मार्ग 89 40
17 एम. शेट्टी मार्ग आणि टॅमरींड मार्ग 60 27
18 ग्रीन स्ट्रीट 47 21
19 साईबाबा मार्ग, रुदरफील्ड मार्ग, एम. के, रोड 68 30
20 कैखुश्रू दुभाष मार्ग 132 59
21 जहांगीर आर्ट गॅलरी आणि व्ही. व्ही. गांधी मार्ग 100 45
22 इरॉस सिनेमापासून ते मॅडम कामा रोड पर्यंतचा महर्षी कर्वे मार्ग 42 19
23 वीर नरीमन मार्ग 55 25
24 दिनशॉ वाच्छा मार्ग 85 38
25 विद्यापीठ मार्ग 77 34
26 हुतात्मा चौक (क्र. 4) 78 35
27 जीवन बीमा मार्ग (एलआयसी इमारतीसमोर) 66 30
28 आयएमसीइ रोड, चर्चगेट 17 8
29 वालचंद हिराचंद मार्ग (भाग 1) 55 24
30 वालचंद हिराचंद मार्ग (भाग 2) 124 55
(ग्रँड हॉटेलपासून बेलार्ड इस्टेटमधील सिंधीया हाऊस पर्यंत)
 
31 रामजीभाई कामानी मार्ग (पश्चिम बाजू) 207 93
32 रामजीभाई कामानी मार्ग (पूर्व बाजू) 247 110
33 शिवसागर रामगुलाम मार्ग 69 31
34 फोर्ट बायलेन्स एरिया (1 व 2) 610 272
35 सर पी.एम. रोड 121 54
36 अदि मर्जबान रोड 45 43
37 रिगल सिनेमा जवळील वाहतूक बेट 25 11
38 महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू) आणि बॉम्बे हॉस्पिटल लेन 88 39
39 जे.एन. हरदिया मार्ग 223 100
  एकूण  4924 2222