मुंबई :  मुंबईमध्ये फ्री वायफाय सुविधेसाठी देण्यात आलेल्या हॉटस्पॉटचा वापर लोक पॉर्न साइट्स पाहण्यासाठी करतात. महाराष्ट्राच्या आयटी खात्याने देण्यात आलेल्या माहितीत हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रोज ३ लाख लोक फ्री वाय-फायचा लाभ घेतात. त्यातील १० टक्के लोक म्हणजे ३० हजार जण पॉर्न साइट्स पाहतात. 


मुंबईत एकूण ५८५ ठिकाणी फ्री वायफायसाठी हॉटस्पॉट देण्यात आले आहेत. लोकांना माहिती तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा यासाठी मुंबईच्या रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी हॉटस्पॉट देण्यात आले आहेत. पण हा खुलासा धक्कादायक आहे. 


आतापर्यत आयटी खात्याने ३८ पॉर्न साइट्स बॅन केल्या आहेत.  त्याची लिस्ट केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. पण दुसऱ्या डॉमेनने इतर पॉर्नसाइट पाहिल्या जातात. जी साइट ब्लॉक झाली ती दुसऱ्या डोमेन नावाने पुन्हा सुरू करण्यात येते. 


मुंबईत फ्री वायफाय या वर्षी जानेवारीत सुरू करण्यात आले. आतापर्यंत ५८५ ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेर एकूण १२०० ठिकाणी हॉटस्पॉटची सुविधा देण्यात आली आहे. 


मुंबईत वाय फायची सुविधा खूप लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे त्याचा दुरूपयोग सोडला तर ५१५ टीबी डाटा लोकांनी वापरा आहे. त्यामुळे आगामी काळात वायफायच्या वापरावर काही चार्ज लावण्याची सरकारची योजना आहे.