मुंबई : भायकळा येथील राणीची बाग लवकरच नव्या पाहुण्यांनी गजबजणार आहे. पेंग्विनपाठोपाठ आता मुंबईकरांसाठी लवकरच बिबट्या, कोल्हा, तरस, गीर अभयारण्यातून सिंह आणि पांझरे वाघही राणीच्या बागेत आणण्याचा विचार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकी प्राधान्यानं बिबट्याला राणीच्या बागेत आणण्याचा विचार महापालिका करतेय. त्यापाठोपाठ कोल्हा आणि तरस आणले जाणार आहेत. त्यानंतर  गुजरातच्या गीर अभयारण्यातून सिंह आणि त्यानंतर पांढ-या वाघांनाही राणी बागेत आणण्याचा महापालिकेचा विचार आहे. 


सध्या पेंग्विन दर्शनासाठी राणीच्या बागेत अभूतपूर्व गर्दी होतेय. हे नवे प्राणी आणल्यानंतरही मुंबईकरांची तसंच इतर राज्यांतल्या पर्यटकांचीही गर्दी वाढेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.