मुंबई : आज गणेश चतुर्थी. घरोघरी आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील गणेशगल्लीत लाडक्या बाप्पाच्या दर्शनासठी भाविकांनी गर्दी केलीये तर दुसरीकडे पुण्यात श्रींमत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीने पुण्यातील मिरवणुकांना सुरवात होईल. 


सकाळी 8 वाजता फुलांच्या रथातून गणेशाची मूर्ती मंडपाकडे नेली जाईल... प्रभात आणि दरबार बॅंड हे या मिरवणुकीचं आकर्षण असेल. 11 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा पार पडेल. 


मंडळाने या वर्षी महाबलीपुरम येथील शिवमंदीराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. आज संध्याकाळी सतीश माथूर यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्धाटन होईल.