मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गणपती उत्सवात टोल माफ देण्याची मागणी होत होती. राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली. मात्र, टोल पास देण्यावरुन संभ्रम आहे. पास देण्याबाबत आरटीओला आदेश नसल्याचे स्पष्ट झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा हायवेवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. या मार्गावरचा टोल 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान माफ करणार असल्याचं सरकारने जाहीर केले आहे. 


यासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना त्यासाठीचा परवाना स्थानिक वाहतूक कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. मात्र अशा प्रकारचे कुठलेही आदेश आले नसल्याचं आरटीओ आणि वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यमंत्री दीपक केसकर यांनी केलेल्या घोषणाचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.