मुंबई : उत्पादन वाढलं की भाव कमी होतात. पण लसणाच्याबाबती हे काही खरं होताना दिसत नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा लसणाचं चांगलं उत्पन्न झालंय. मात्र तरीही किरकोळ बाजारात लसणासाठी किलोला 180 ते 200 रुपये मोजावे लागतायत. नवा लसूण बाजारात आलाय़. त्यां वजन अधिक असल्यानं दराचं पारडंही किरकोळ व्यापा-यांनी वाढवलंय. 


घाऊक बाजारात या लसणाला किलोला 30 ते 70 रुपये मोजावे लागलाय. पण किरकोळ बाजारात मात्र दर अजुनही चढेच आहेत. किरकोळ बाजारात लसूण वेगवेगळ्या दराने विकला जातोय. त्यामुळं आता भाजीला लसणाऐवजी कांद्याची फोडणी देणं गृहिणींना गरजेचं झालंय.