मुंबई : रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर, बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येईल, बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.


राज्य दुष्काळी परिस्थितीतून बाहेर येईपर्यंत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना स्वस्त दरात धान्य देण्यात येईल, या योजनेअंतर्गत शेतमजूर आणि भूमीहिनांनाही स्वस्त दरात धान्य देण्याचा सरकारचा विचार आहे, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. काँग्रेसच्या हुस्नबानु खलिफे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला बापट उत्तर देत होते.