मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांचा खर्चही अधिक असतो. त्यामुळे आमदारांना दिलेली पगारवाढ योग्यच असल्याचं, गिरीश महाजन यांनी म्हंटलंय. 


विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. 


एकंदरीत राज्याच्या तिजोरीवर भलामोठा आर्थिक बोजा असताना, सरकार तसंच इतर राजकीय पक्षही आमदारांच्या पगारवाढीबाबत अनुकूलच दिसून येताहेत.