मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


येत्या काळात शेअर बाजारात वाढ झाली तर सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण सोनं कालपर्यंत 29 हजार 224 रुपयांवर होतं, मात्र आज 28 हजार 706 रुपयांवर येऊन पोहोचलं, तर चांदीमध्येही 1 हजार 26 रुपयांची घट झाली आहे. सध्या बजारात चांदीचा प्रतिकिलो दर 36 हजार 958 रुपये आहे.