सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने खरेदीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. सोन्याचा दर आता कमी झाला असला तरी सोने मार्केट थंड पडले आहे. लोक सोन्याची खरेदी करण्यास टाळत आहे. 


सध्या लोकांकडे रोख पैसा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जुन्या नोटा बंद झाल्याने त्यांच्याकडील खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच आता खरेदी केल्या तो व्यवहार बँकांच्या आणि इन्कम टॅक्सच्या नजरेत येऊ शकतो त्यामुळे लोक असा व्यवहार करण्यास टाळाटाळ करत आहेत. भविष्यात पैसा हातात आला तर मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकते. बँकांमधून आठवड्याला ठराविक रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत  सोने खरेदी लांबणीवर पडली आहे. 


सोन्याचा भाव २८ हजार ८०० होऊन लग्न सराईच्या दिवसात सोने व्यापार थंड झालाय. लग्न सराईच्या दिवसात राज्यात १०० ते १२५ कोटीचा व्यवहार होतो, यात आता 30-45 % पेक्षा कमी व्यवहार सध्या होत असल्याचे श्री मुंबई ज्वेलर्स असोसिएशन उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले. 


लग्न समारंभात एकूण  ३.५ -४ टन सोन्याची खरेदी विक्री होते. हा व्यवहार १०० -१२५ कोटी रूपयांपर्यंत जातो. यात ज्वेलेरी, हिरे यांचाही समावेश आहे. नेहमी तुलनेन अवघे १५-२० टक्के विक्री सध्या होते आहे. 


जुन सोने देऊन मोडून दागिने करण्याकडे ग्राहकांचा भर आहे. नेहमी लग्न सराईच्या दिवसात ग्राहकांची गर्दी आता सोने बाजारात गर्दी नाही.