मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री वाहतुकीची मोठी कोंडी झाली. चेंबूरच्या अमरमहाल उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे हा पूल सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री वाहनांच्या मोठ्या रांगा या परिसरात पहायला मिळाल्या. अमर महाल उड्डाण पुलाचा एक अख्खा ब्लॉकच खिळखिळा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ब्लॉकचे नट बोल्ट पुन्हा बसवण्यासाठी पूल सध्या बंद करण्यात आला आहे.  हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूकीची मोठी समस्या बघायला मिळणार आहे.


अपुरे पोलीस कर्मचारी आणि चुकीचे नियोजन यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढलीय असा आरोप स्थानिकांनी केलाय. तसेच हा गोल्डन हवर लवकर रद्द व्हावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय.


या गोल्डन हवरचा ताण वाहतूकीबरोबर पोलीस कर्मचा-यांवरही पडत आहे. त्यामुळे हा गोल्डन हवर रद्द झाला पाहीजे असं मत पोलिसही खासगीत करताहेत.