मुंबई : दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली दोन वर्ष सरासरीपेक्षा कमी पाऊल झाल्य़ामुळं राज्यातले अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळं सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता 2016 चा पावसाळा गेल्या दोन वर्षांची तहान भागवणारा असेल असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. 


2014 आणि आणि 15 या दोन वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी झाला. यंदा फेब्रुवारीतच राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा संपलाय. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाकडे पाहिल्यास 2016 च्या मान्सूनचं चित्र अतिशय सकारात्मक दिसतंय. 


गेल्या दोन वर्षाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होता. फेब्रुवारी मार्चमध्ये तयार होणारी ही स्थिती 2015 मध्ये संपूर्ण मान्सूनच्या काळात सक्रिय होती. यंदा मात्र अल निनो फारसा सक्रिय होत असल्याचं निरीक्षणांवरून दिसत नाही असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलाय.