मुंबई : पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी. पोलिसांना नव्या वर्षाची भेट मिळालीय. पोलिसांची ड्यूटी आता आठ तासांचीच होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर पोलीस म्हंटलं की २४ तास ड्युटी असंच चित्र असते. पण जास्त ड्युटी अवर्सचा ताण पोलिसांवर येतोय. त्यामुळे आता पोलिसांना फक्त आठ तासच काम करावे लागणार आहे.  


जानेवारी  २०१७ पासून मुंबईतल्या सगळ्या म्हणजे ९३ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे ड्यूटी ओव्हर्स टप्प्याटप्प्याने ८ तासाचे होणार आहेत. तशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांनी दिली आहे.