गणेशोत्सवात लाऊडस्पिकरच्या परवानगीबाबत सरकारने दिले आदेश
गणेशमंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवण्याची परवानगी देणासंदर्भातला आदेश सरकारनं जारी केलाय. पण या आदेशात सरकारनं फक्त चारच दिवसांची परवानगी दिलीय. त्यामुळे आता जोर जोरात गाणी वाजवण्याची हौस फिटवण्यासाठी यंदा एक दिवस कमी मिळणार आहे.
मुंबई : गणेशमंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवण्याची परवानगी देणासंदर्भातला आदेश सरकारनं जारी केलाय. पण या आदेशात सरकारनं फक्त चारच दिवसांची परवानगी दिलीय. त्यामुळे आता जोर जोरात गाणी वाजवण्याची हौस फिटवण्यासाठी यंदा एक दिवस कमी मिळणार आहे.
गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत लाऊडस्पिकर वापरण्यासाठी ५ दिवस परवानगी देण्याची घोषणा सरकारनं याआधी केली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ ४ दिवस परवानगी असल्याचा आदेश काढण्यात आलाय. त्यानुसार दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाऊडस्पिकर लावता येणार आहे. त्यामुळे एक दिवस तर कमी झालाच आहे. त्याजोडीने हा आदेश जिल्हा प्रशासनापर्यंत पोचेर्यंत एक दिवस निघून गेलाय. त्यामुळे प्रत्यक्षात तीनच दिवस लाऊडस्पिकर वापरायला मिळणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळींकडून याविरोधात संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी शेवटचे ५ दिवस मुभा होती. मात्र सरकारच्या निर्णयामुळे त्यातील उत्साहावर विरजन पडणार आहे. या पार्श्वभूमिवर गणेश मंडळांचे प्रतिनिधी आज जिल्हधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.