मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुंबई क्राईम ब्रान्चनं अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंगाळेने केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत होते... याच प्रकरणात पोलिसांनी आता मनिष भंगाळेला अटक केली आहे. पण नेमके मनिष भंगाळेला कोणत्या आरोपांखाली अटक करण्यात आलीय? याबाबत मात्र मुंबई पोलिसांनी अजुनही खुलासा केलेला नाही. 


मंगेश भंगाळे या इथिकल हॅकरने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैंकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा 'आप' नेत्या प्रीती मेनन यांनीदेखील केला होता.


मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कोणाला फोन कॉल केले होते, याची माहिती जाहीर केली होती. त्यात एक नंबर खडसेंचा होता असा दावा मनिष भंगाळे याने केला होता.