मुंबई : राज्यात मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. पुढील चार दिवस आणखी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. फळपिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.


अहमदनगर


संगमनेर, अकोलेत पाऊस आणि गारपीट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातही आज आणखी पाऊस झाला आहे. खानदेशातील नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातही गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.


धुळे आणि नंदुरबार


वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली आहे, धुळे जिल्ह्यातील साक्रीत वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.


बुलढाणा


वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यामध्ये कांदा बीज, मका, गहू, हरबरा पिकाचं अतोनात नुकसान झालंय. 


नाशिक


नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावासाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी  गारांचा खच साचून कांदा, डाळींब गहू, हरभरा आणि आंबा पिकांसह फळबागांचं नुकसान झालंय. 


जळगाव


जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील सुमारे 15 गावांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गरपीटीचा जोरदार तडाखा बसला. पारोळा तालुक्यातील कोळपींप्रि, अंबापींप्रि, बहादरपुर, कंकराज, भिलाली, इंद्रापींप्रि, सडावन, रडावन तसेच अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, फाफोरे या गावात गारपीट तर मंगरुळ, शिरुड गावात वादळाचा तडाखा बसला.


परभणी


परभणीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पालम, गंगाखेड, पूर्णा आणि मानवत तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस पडला. त्यामुळ आंबा, ज्वारी या पिकांच मोठ्ठं नुकसान झालंय. 


हिंगोली


हिंगोलीमध्ये रात्री उशिरा जोराचा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील कडोळी गोरेगाव येथे गारा पडून कांदा, गहू, हरबरा आणि टाळका ज्वारीच अतोनात नुकसान झालंय. औंढा नागनाथ तालुक्यातील माथा परिसरातही बराच वेळ गारांचा पाऊस पडला. कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, सोडेगाव, पांघराशिंदे या गावात गरांसाह पाऊस झालाय. वसंत तालुक्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला.