मुंबई : हार्बर मार्गावरील 'डायरेक्ट करंट' (डीसी) ते 'अल्टरनेट करंट' (एसी) विद्युत परिवर्तन चाचणीसाठी आज शनिवारी मध्यरात्री १२पासून रविवार पहाटे ६पर्यंत सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची लोकल १०.१६ वाजण्याची असेल. तसेच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसटी-पनवेल शेवटची लोकल शनिवारी रात्री १०.१८ वाजता तर शेवटची सीएसटी-वाशी लोकल रा. १०.३७ वाजता सुटेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेय.


सीएसटी ते पनवेल व अंधेरी आणि ठाणे-वाशी-नेरूळ-पनवेल दरम्यानची वाहतूक विशेष मेगाब्लॉकच्या काळात बंद असणार आहे. त्यामुळे, रविवार, १३ मार्च रोजीचा हार्बरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.


रात्रीच्या शेवटच्या लोकल


सीएसटी-अंधेरी : रा. ११.०७ वा.
पनवेल-सीएसटी : रा. ९.५९ वा.
सीएसटी-वाशी : रा. ९.३७ वा.
सीएसटी-अंधेरी : ११.०७ वा.
अंधेरी-सीएसटी : रा. १०.३७ वा.
ठाणे-पनवेल : रा. १०.१५ वा.
ठाणे-वाशी : रा. १०.४० वा.
पनवेल-ठाणे : रा. १०.११ वा.
वाशी-ठाणे : रा. १० वा.


रविवारची पहिली लोकल


सीएसटी-पनवेल : स. ६.४४ वा.
पनवेल-सीएसटी : स. ६.३५ वा.
वाशी-सीएसटी : स. ६.३१ वा.
सीएसटी-अंधेरी : स. ६.४०वा.
अंधेरी-सीएसटी : स. ६.१८ वा.
ठाणे-वाशी : स. ६.३९
ठाणे-पनवेल : स. ७.०६ वा. वाशी-ठाणे : स. ६.४८ वा. पनवेल-ठाणे : स. ६.३९ वा. 


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक


हार्बरवर विद्युत परिवर्तन कामामुळे शनिवारी मेगाब्लॉग असला तरी मेनलाइनवर ठाणे आणि कल्याण स्टेशनरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 'मरे'चा मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर रविवार, १३ मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर स. १०.३० ते दु. ३ वाजेपर्यत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. 


ठाण्याहून स. १०.४६ ते दु. ३.२८ या वेळेत सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील लोकल मुलुंड, भाडूंप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबतील. ब्लॉकदरम्यान ठाण्याहून स. ११.२१ ते दु. २.४३ या वेळेत सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावरून चालविण्यात येतील.