उद्धव ठाकरेंनी केलं `हार्दिक` स्वागत
गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाचं आंदोलन छेडणारा हार्दिक पटेल आज मातोश्रीवर दाखल झाला.
मुंबई : गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाचं आंदोलन छेडणारा हार्दिक पटेल आज मातोश्रीवर दाखल झाला.
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषदही पार पडली.
महापालिकेच्या रणसंग्रामात मुंबईतल्या गुजराथी मतदारांना शिवसेनेच्या मागे उभं राहण्याचं आवाहन करणार असल्याचं हार्दिकनं यावेळी म्हटलंय. पण थेट प्रचारसभामध्ये सहभागी होणार नसल्याचंही हार्दीकनं यावेळी स्पष्ट केलं.
हार्दिक पटेलला बाळासाहेबांचा आशीर्वाद हवा होता त्यासाठी तो मातोश्रीवर आला होता, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
मुंबईत एकूण मतदारांपैकी पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त गुजराती मतदार आहेत. त्यामुळे गुजराती मतं शिवसेनेकडे वळवण्यासाठी ही मोर्चेबांधणी केल्याचं बोललं जातं आहे. सोन्यावरचा कर आणि नोटाबंदी यामुळे गुजराती समाज भाजपापासून दुरावल्याचं चित्र आहे आणि हीच मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शिवसेना करते आहे.
संध्याकाळी गोरेगावमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या जाहीर सभेतही हार्दिक पटेल सहभागी होणार आहेत.