मुंबई : मुंबईतल्या मेट्रो -३ ला हिरवा कंदील देत मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईत लावलेली वृक्षतोडीवरील बंदी उठवलीय. मात्र याचिकाकर्त्यांच्या विनंतीप्रमाणे या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतील ट्राफिकच्या समस्येवर उपाय म्हणून मेट्रो ३ अनिवार्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलय. आज इथं वावरणा-या मानवी जीवांपेक्षा इथली झाडं महत्त्वाची आहेत का? याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत हायकोर्टाच्या मुख्य न्यामूर्तींनी व्यक्त केलं होत. 


मेट्रो प्राधिकरणानं या कामात होणारी वृक्षतोड भरून काढण्यासाठी तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण करणार असल्याची ग्वाही हायकोर्टात दिलीय. यावर समाधान व्यक्त करत या वचनांची पूर्तता होते की नाही हे पाहण्यासाठी हायकोर्टाच्या सध्याच्या दोन न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे.  


दक्षिण मुंबईतील चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, विधानभवन या परिसरात मिळून मेट्रो ३ ची ९ स्टेशन्स उभाऱण्यात येणारायत. या कामासाठी या परिसरातील सुमारे ५ हजार झाड तोडावी लागणार आहेत. आता याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात धाव घेतात का याकडे लक्ष लागलंय.