एचडीएफसी बँकेची ऑफर, रिटेल स्टोअरमधूनही पैसे काढा
आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.
मुंबई : आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.
फक्त ग्राहक केवळ 2000 रुपयेच काढू शकतील, असंही एचडीएफसी बँकेने म्हटलं आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी नवी ऑफर सुरु करणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही आता रिटेन स्टोअरमधूनही पैसे काढू शकता.
मुंबईतील 50 पेक्षा जास्त मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करुन ग्राहक 2000 हजार रुपये काढू शकतात, असं एचडीएफसी बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे. एचडीएफसी बँकेने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
एचडीएफसी बँकेने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन या दुकान मालकांच्या संघटनेसोबत टायअप केलं आहे. ही सुविधा फक्त एचडीएफसी बँकेच्याच नाही तर इतर बँकांच्या ग्राहकांना उपलब्ध असेल.