मुंबई : गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत आहे, तर महाराष्ट्र आणि गोव्याची प्रादेशिक भाषा मराठी येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IVR म्हणजेच इंटरअॅक्टिव्ह व्हॉईस रिसपॉन्समध्ये मुंबईची प्रादेशिक भाषा गुजराती येत आहे. एचडीएफसी बँकेनं दिलेल्या या क्रमांकावर आम्ही फोन केला होता, या नंबरवर मात्र मराठी भाषेचा ऑप्शन येत आहे. त्यामुळे ही चूक नेमकी एचडीएफसी बँकेची का गुगलची आहे याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्टता नाही. या सगळ्या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.



IVR म्हणजे नेमकं काय?


IVR म्हणजेच इंटरअॅक्टिव्ह व्हॉईस रिसपॉन्स. कोणत्याही कस्टमर केअरला आपण फोन करतो तेव्हा या टेक्नॉलॉजीच्या मार्फत समोरची व्यक्ती तुम्हाला तुमची भाषा निवडण्याचा ऑप्शन देते.